मनमुराद जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या खवैयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आपण जेव्हा हॉटेल मध्ये जेवणाच्या बिलासोबत 18 टक्के जीएसटी मोजायचो तेव्हा असे वाटायचे कि सरकार सुद्धा आपल्यासोबत जेवले कि काय कारण 1000 रुपयांच्या बिलावर 180 रुपये जीएसटी लागायचा. अनेक तक्रारी केल्यानंतर आता सरकार ने हा जीएसटी कमी केला आहे, बुधवार पासून हा जीएसटी फक्त 5 टक्के लावला जाणार आहे, म्हणजे 1000 रुपयांना फक्त 50 रुपये जीएसटी लागणार आहे. शिवाय ह्या टॅक्स मध्ये सुट देण्याच्या बदल्यात इनपुट टॅक्स क्रेडीट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ह्या टॅक्स सिस्टीम मध्ये बदल केल्यामुळे मेन्यू कार्ड मध्ये दर कमी होतील असा अंदाज बांधला जात होता परंतु हॉटेल असोसिअशन चे प्रमुख म्हणाले कि आधीच आमचा खूप तोटा होत आहे त्यात अजून आम्ही दर कमी करू शकत नाहीत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews